An Autonomous Institute affiliated to SGBAU, Amaravati University
दिनांक २१.०८.२०२४ रोजी यवतमाळचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.कुमार चिंता साहेब यांनी जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ येथे भेट दिली.यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील एक मात्र ऑटोनॉमस महाविद्यालय व NAAC A+ ग्रेड प्राप्त करणारे अभियांत्रिकी महाविद्यालय ठरल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ.शितल वातिले सर यांनी श्री.कुमार चिंता साहेब यांना माहिती दिली.ह्या वेळी मा.पोलिस अधीक्षक साहेबांनी सर्वांशी हितगुज केले व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे श्री.कुमार चिंता साहेब यांनी अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या वतीने संस्था सचिव डॉ. शितल वातिले सर यांनी श्री. कुमार चिंता साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.व्ही.एल.भांबेरे,श्री. उत्पलजी टोंगो व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यशस्वीरित्या पूर्ण झाला.
On 27/07/2024 Jagdamba Engineering College organized a placement drive for Computer Engineering Department on 27/07/2024 in which the company Codernetes IT Solutions, Pune participated in which Mr.Devesh Vaidya Founder & Soft Skills Trainer Ishita's Consultancy Services, Mr.Prince Jha, IT Trainer Ishita's Consultancy Services and Mr. Shubham Rajole Assistant HR, Codernetes IT solutions, Pune. On this occasion the honorable secretary of the college Dr. Shital Vatile sir was mainly present, also the principal of the college Dr. V. L. Bhambere, Registrar Dr. Parag Thackeray, Head of Department Prof. Sagar Raut, First Year Incharge Prof. Pratik Rathod,Training & Placement Officer Pvt. Dhanshree Pohre Ma'am, Prof. Deepak Charde, Prof. Praveen Wankhede, Prof. Sunil Chinte, Prof. Chanchal Kshirsagar and others were present, Training & Placement department made efforts to make the program successful, coordination Prof. Abhijit Moghe did.
स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दि. २१/३/२०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले. यावेळी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथुन डॉ. रसिका पेंदोर, समाजसेवा अधीक्षक आशिष खडसे, मोहन तळवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांबेरे, विभाग प्रमुख डॉ. विजय नेवे, प्रा. पराग ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण वानखडे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित राऊत, रासेयो स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रविण वानखडे यांनी केले, आशिष खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवुन दिले. डॉ. विजय भांबेरे यांनी उपस्थित सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या व रक्तदान हेच श्रेष्टदान याची महती पटवुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. चिन्मयी तांबुले हिने केले.
सदर रक्तदान शिबिराकरिता महाविद्यालयामधील ७६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. रक्तदान शिबिर यशस्विरित्या पार पाडण्याकरीता रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव पार्लावार व सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी कौतुक केले.
आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी जगदंबा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे महिला दिन कार्यक्रम आयसीसी समिती अंतर्गत घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नेहा पडवळे आणि डॉ.कविता करोडदेव (बोरकर) उपस्थित होते, प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.जी.नेवे सर,आयसीसी समितीच्या प्रभारी प्रा. एन.के. चौकडे ,प्रा. डी.बी.पोहरे,प्रा.एस.आर.राऊत, प्रा.पी.डी.ठाकरे डॉ.एम.बी.वसू, , प्रा.पी.डी.नखाते आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.माँ सरस्वतीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.जी. नेवे सरांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे भाषण केले. डॉ. नेहा पडवळे यांनी आपले भाषण "रागाच्या समस्येचे व्यवस्थापन कसे करावे, आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी" याविषयी मार्गदर्शन केले.आणि डॉ.कविता करोडदेव (बोरकर)यांनी विद्यार्थ्यांना "योगाचे महत्त्व, प्रत्येकाच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व, आहार" याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन प्रा.व्ही.एस.गिरी यांनी केले.अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला.
On 02/03/2024 "Coding Club" of JCOET organized "Code Champ-24" for first to final year students of all branches. The main objective of this event is to enhance the coding skills and build a deeper understanding of complex coding concepts. The program was inaugurated by cutting the ribbon in hand's of principal Dr. V. L. Bhambere in presence of Prof. P . D. Thakare, Prof. S.P. Chinte Coding Club Incharge. Prof. P. H. Rathod, Dr. Sumit Raut,Prof. A. B. Samarth Prof. N.H. Raja. All students enjoyed the competition very much and we hope that they will continue this type of practice of coding and exploring new ideas and solutions every day. Also, we Congratulate the winners and Runner and thank the students for their active involvement in the competition, thereby making it successful. Coding Club Members Mr. Tejas Pillare, Mr. Shashikant Mutkule, Mr. Krishna Pagrut and Shailesh Rathod took efforts for successful organization of this competition.
स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २७/८/२०२४ रोजी गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवशक्ती महाविद्यालय, बाभूळगाव चे प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. माने, तसेच महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. विजय नेवे, निबंधक, डीन शैक्षणिक डॉ. मेघा वसु, विभाग प्रमुख प्रा. सागर राऊत, प्रा. धनश्री पोहरे, प्रा. प्रतिक राठोड, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रविण वानखडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राधाकृष्ण च्या मूर्तीचे पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रा. प्रविण वानखडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. डॉ. विजय नेवे यांनी दहीहंडी उत्सव हा एकतेचे प्रतीक आहे असे सांगितले, तसेच डॉ हेमंत बारडकर यांनी सर्वं विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मटकीचे पुजन करण्यात आले. राधाकृष्ण विषयावर नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, तसेच ब्लाइंड मटकी भोड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. शेवटी उपस्थित सर्वाना गोपाळकाला वाटण्यात आला. या उत्सवात संपुर्ण विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. हा उत्सव यशस्वीपणे राबविल्या निमित्त महाविद्यालयाचे सचिव डॉ. शितल वातीले व प्राचार्य डॉ. विजय भांबेरे यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले